भाऊबीजेच्या शुभेच्छा भाऊ व बहिणीसाठी मराठीमध्ये / Happy Bhaubeej Wishes In Marathi 2025.🙏🎁

Bhaubeej wishes in marathi 2025:- यावर्षी भाऊबीज सण 23 ऑक्टोबर 2025 रोजी येत आहे. भाऊबीज (भाई दूज ) हा सण यम द्वितीया म्हणून देखील संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी यम देवतेचीही पूजा केली जाते. भाऊबीज हा पवित्र सण भाऊ आणि बहिणीचे पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला कुंकवाचा टिळा लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, त्यानंतर भाऊ बहिणीच्या आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबीज सणानिमित्त तुम्ही तुमच्या बहीण / भावाला भाऊबीज शुभेच्छा मराठीत पाठवुन त्यांचा विषयी प्रेम,आदरभाव दाखवू शकता.
भाऊबीज शुभेच्छा २०२५ निमित्ताने Bhaubeej wishes in marathi, Bhaubeej status in marathi, Bhaubeej shubhechha, bhaubeej wishes in marathi for brother, bhaubeej wishes in marathi for sister etc तुमच्या मित्र- मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना भाऊबीज शुभेच्छा फोटो मराठीत द्या.
भाऊबीज शुभेच्छा ,स्टेटस, बॅनर, मेसेज, फोटो,कोट्स मराठी 2025.

सोनेरी किरणांनी उजळली पहाट,
आनंदाच्या क्षणांची सुरू झाली उधळण,
भावंडांच्या प्रेमाचा उत्सव घेऊन आली भाऊबीज!
🙏✨भाऊबीज हार्दिक शुभेच्छा! 💫💛
भाऊबीज विशेष मराठी / bhaubeej in marathi quotes
हॅपी भाऊबीज! 🪔
भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि अतूट नात्याला 🎁✨समर्पित या पवित्र सणाच्या
आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🎁
बहिण मग ती कोणाचीही असो तिचा सदैव आदर करा,
कारण हाच आहे आपल्या शिवरायांनी दिलेला खरा संस्कार.
✨🎁भाऊबीज निमित्त सर्वांना शिवमय आणि भगव्या शुभेच्छा! 🪔🎁⛳
भाऊबीज संदेश मराठी / Bhaubeej messages in marathi 2025.
जिव्हाळ्याचे बंध दिवसेंदिवस अधिक उजळत राहो,
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट नांदो…
प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सुंदर सण!
🙏💫भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💖🪔
भाऊबीज quotes in marathi / bhaubeej emotional quotes in marathi.
जग जिंकायचं असेल तर साथ देणारा भाऊ हवा,
आणि प्रत्येक वेळी “हार मानू नकोस” असं सांगणारी बहीणही हवी!
अशा या भावाबहिणीच्या नात्याच्या सणानिमित्त
🙏🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💫
भाऊबीज शुभेच्छा भावासाठी मराठी / Bhaubeej wishes in marathi for brother 2025.

🎁💥सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य,
आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले
जीवन प्रकाशमय होवो.
दिवाळी भाऊबीजच्या शुभेच्छा!🎁💥
भाऊ हा आपल्या आयुष्यातील न बोलणारा रक्षक असतो,
तो कधी दाखवत नाही, पण त्याचं प्रेम सगळ्यांपेक्षा खोल असतं.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आधार देणारं, विश्वासानं जोडलेलं नातं म्हणजे
भाऊ आणि बहीण!
✨या सुंदर नात्याच्या सणानिमित्त भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💥
Bhaubeej caption in marathi for brother
भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो,
पण दादा, मला गिफ्ट नको
मला फक्त तुझं एक वचन हवंय…
की तू आयुष्यभर माझ्या सोबत असशील,
माझा आधार, माझं बळ बनून!
🍫✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁💥
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💛
जशी गंगा पूजते यमुनेला, यमी पूजते यमराजाला,
आणि सुभद्रा पूजते श्रीकृष्णाला,
तसंच माझ्या भावाचं जीवनही गंगायमुनासारखं सुख-समृद्धीने वाहत राहो,
तो नेहमी प्रगती करो, फुले-फळे आणि आनंदाने नांदो! 🎁💥🙏
भाऊबीज शुभेच्छा भावासाठी / bhaubeej quotes in marathi for brother.
तेव्हा मी नेहमी तुझ्या सोबत उभी असेन.
तू माझा खरा आधार आहेस,
आणि माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही…
My Bro ❤️
🍫🎁हॅपी भाऊबीज माझ्या प्रिय भावाला! 💫
काय प्रार्थना मागू तुझ्यासाठी, जी तुझ्या चेहऱ्यावर आनंदाची फुले उमलवेल…
फक्त एवढंच म्हणेन देव तुझं भाग्य तारकांप्रमाणे उजळो,
आणि तुझं आयुष्य सदैव प्रकाशमान राहो! 🪔💛
bhaubeej quotes in marathi for instagram
बहिणीची हीच एक मनापासून इच्छा,
भावाला कधीही आयुष्यात संकटांचा सामना करावा लागू नये.
🙏🎁 तो नेहमी आनंदी, यशस्वी आणि समाधानी राहो,
हीच भाऊबीजेच्या दिवसाची शुभेच्छा! 💫🪔
बहिणीचं प्रेम हे कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नसतं…
ती दूर असली तरी मनात तिचं स्थान कधी कमी होत नाही.
अनेक नाती अंतराने फिकट होतात,
पण भाऊ-बहिणीचं नातं मात्र कधीच कमी होत नाही.
🙏🎁✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
काळजाची चिंधी करूनही मला हसवणारा,
असाच आहे माझा भाऊ माझं खऱ्या अर्थानं रत्न!
🧨🎇भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💥❣️
bhaubeej marathi wishes
🙏🎁 माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा,
माझा लाडका आणि आधार देणारा भाऊ माझा दादा!
तुला भाऊबीजेच्या मनःपूर्वक खूप शुभेच्छा! 🪔💫
भाऊबीज शुभेच्छा स्टेटस / Bhaubeej msg in marathi 2025.

दीपावलीचा आरंभ होतो उजळत्या पणत्यांच्या साक्षीने,
आणि जिव्हाळ्याच्या नात्यांची ऊब वाढते त्या तेजस्वी ज्योतीने.
🙏🎁आपणास दिवाळी आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨💥
बहिणीच्या ओवाळणीतील प्रेम भावाच्या आयुष्यात दीर्घायुष्य आणि सौख्य आणतं,
तर भावाच्या मायेने बहिणीच्या मनात जगण्याचं बळ आणि आधार निर्माण होतो.
हा दिवस फक्त विधी नाही, तर नात्याचं नव्यानं उजळलेलं प्रतिक आहे.
आपली ही नाती सदैव प्रेम, सन्मान आणि विश्वासाने बहरत राहो.
🎉✨भाऊबीजेच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! 🪔🎁🙏
Bhaubeej wishes in marathi quotes 2025.
चंदनाचा टिळा आणि नारळाची भेट,
भावाची आशा, बहिणीचं प्रेम अन् मनातली आपुलकीची प्रीत.
आनंद आणि उत्साहाने भरलेला हा सुंदर सण,
आपल्या आयुष्यात नवं तेज घेऊन येवो!
🙏💥🎁हॅपी भाऊबीज! 🪔💛
भाऊबीज स्टेटस मराठी / Happy Bhaubeej status in marathi 2025.

सोन्याच्या ताटी लुकलुकल्या दिव्यांच्या ज्योती,
ओवाळते प्रेमाने आपल्या भाऊरायाला ती,
वेड्या बहिणीची ही निरागस माया,
भावंडांच्या या नात्याला सलाम !
🙏🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💫🧨
भाऊबीज हा सण फक्त एका दिवसाचा असला,
तरी भावंडांचं नातं आयुष्यभराचं असतं.
दूर असलो तरी मनाने नेहमी जवळ असतो,
प्रेम, आधार आणि आपुलकीची ही साथ कधीही तुटत नाही.
🧨🎊भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💖
भाऊबीज शुभेच्छा बहिणीसाठी / Happy Bhaubeej wishes in marathi for sister 2025.
चमचमणाऱ्या चांदण्यांसारखं तेज तुझ्या आयुष्यात पसरू दे,
तुझं घर आनंदाने आणि समाधानाने भरून जावो.
🎁✨ प्रिय ताई, तुला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
मानलेली असलीस तरी काय फरक पडतो,
तू माझ्यासाठी खरी सखी, खरी बहिणच आहेस.
तुझं स्थान मनात तितकंच खास आहे.
🎉✨भाऊबीज निमित्त तुला मनःपूर्वक शुभेच्छा, बहिणाबाई! 🪔💛
भाऊबीज शुभेच्छा फोटो मराठी / Happy Bhaubeej images in marathi 2025.

रक्षणाचं वचन, प्रेमाचं बंधन,
घेऊन आला हा सुंदर सण
मनापासून तुला लाखो शुभेच्छा,
आज आहे बहिण-भावाच्या नात्याचा पवित्र उत्सव.
🙏💥भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💖🪔❣️
हे नातं रक्ताचं नसून आत्म्याच्या बंधनानं जोडलेलं आहे…
तीच्या डोळ्यात अश्रू आले की त्याचं मन व्याकूळ होतं,
आणि तो अडखळला तर तिचं जग थबकतं.
असं हे भावंडांचं नातं प्रेम, विश्वास आणि वचनांनी बांधलेलं.
🙏🎁भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔💫
भाऊबीज कोट्स इन मराठी / Happy Bhaubeej quotes in marathi 2025.

दिवाळीच्या पणतीला साथ असते उजेडाची,
आणि भाऊबीजेच्या या मंगल क्षणी
माझ्या मनात असते तुझ्या भेटीची आतुरता.
🙏🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔✨
कधीच काही वस्तू नकोय तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ कायमसोबत हवी आहे…
तुझी साथ ही दिवाळीच्या 🍫 मिठाईपेक्षाही गोड,
मनाला आनंद देणारी आहे!
🙏✨दादा / ताई भाऊबीजेच्या प्रेमळ शुभेच्छा! 💛🪔
भाऊबीज शुभेच्छा बॅनर मराठी / Happy Bhaubeej banner in marathi 2025.

जिव्हाळ्याचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत राहो,
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट टिकून राहो.
🙏🎁या सुंदर नात्याच्या सणानिमित्त
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔💫
bhaubeej wishes in marathi status
आली आज भाऊबीज आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सण,
ओवाळते आपल्या भाऊरायाला मनभर शुभेच्छांनी.🎇
नात्यात कायम राहो स्नेहाचा गोडवा.
🎊✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💫
Bhaubeej msg in marathi text.
मला नेहमी धाकात ठेवणारा तू,
भाऊबीज आल्यानंतर मात्र अगदी जिव्हाळ्याचा होतोस.
तुझ्या या बदलण्यात खरी माया दडलेली असते.
🙏✨🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💥
भाऊबीज शुभेच्छा बहिणीसाठी / Bhaubeej quotes for sister in marathi 2025.

आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
💥✨ताई तुला भाऊबीजेच्या
मनपूर्वक शुभेच्छा!💥✨🎁
ताई, तुझ्यासमोर कसला आलाय घमंड?
तू एक शब्द बोलशील तर तुझ्या पायाशी डोकं ठेवायलाही मी तयार आहे.
तू फक्त बहीण नाहीस, माझी प्रेरणा, माझा आत्मविश्वास आणि माझं बळ आहेस.
तुझ्या आशीर्वादाने प्रत्येक अडथळा सोपा वाटतो आणि प्रत्येक दिवस खास होतो.
✨🎁माझ्या प्रिय ताईला भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔💛🧨
bhaubeej wishes from brother to sister in marathi.
माझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यात जगातील सर्व आनंद, समृद्धी आणि सौख्य फुलत राहो.
तुझं हसू कधीच ओसरू नये, तुझे स्वप्नं आकाशाला भिडोत.
तू कितीही मोठी झालीस तरी माझा आधार आणि आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल.
🎁✨ Happy Bhaubeej, my dearest sister! 🪔💖🙏
मी चांगला भाऊ आहे की नाही, हे मला ठाऊक नाही…
पण ताई, तू माझ्यासाठी जगातील सगळ्यात खास बहीण आहेस!
तुझं हसू, तुझं प्रेम आणि तुझी साथ माझं खऱ्या अर्थानं भाग्य आहे.
💥✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय ताई! 🎁🍫💥
आयुष्यात मोठी बहीण असणं ही एक आशीर्वादासारखी गोष्ट असते.
ती फक्त बहीण नसते, तर आईसारखी काळजी घेणारी,
मैत्रिणीसारखी समजून घेणारी आणि प्रत्येक वळणावर साथ देणारी असते.
तिच्या शब्दांत मार्गदर्शन असतं, आणि तिच्या मिठीत समाधान.
अशा त्या प्रत्येक मोठ्या बहिणीला मनापासून सलाम.
🎁✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💖🔥
भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी / Bhaubeej sms in marathi 2025.
बहिणीचं प्रेम असतं भावावर अतूट आणि निर्मळ,
त्याच्या आयुष्यात नांदो नेहमी तिच्या प्रेमाची सावली सुंदर
भावाची साथ असते बहिणीला प्रत्येक क्षणी,
तोच तर तिचा आधार, तिचा विश्वास जिव्हाळ्याचा मनी.
या ताई-दादाच्या पवित्र नात्याच्या सणानिमित्त,
🙏💥आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💫🎊🎁
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा / Bhaubeej chya hardik shubhechha in marathi 2025.
तुझं प्रेम आकाशाहूनही विशाल आहे,
म्हणूनच मला कधीच कोणाची भीती वाटत नाही.
तू असाच कायम माझ्या सोबत राहा,
हाच माझा प्रत्येक दिवसाचा आशीर्वाद आहे.
🧨✨🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💖🪔
Bhaubeej wishes in marathi images.
तू पाठीशी असलास की आभाळही लहान वाटतं,
तुझ्या उपस्थितीनेच मन आनंदाने भरून जातं.
🙏💥प्रिय दादा, तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा! 🪔💛🎁
Images of bhaubeej in marathi.
💥💫या दिवाळीला लक्ष्मीमातेची
कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते
गिफ्ट तू नक्की देशील!🎁✨
Happy bhaubeej in marathi images.
देवा, माझा भाऊ खूपच गोड आहे,
आईचा लाडका आणि माझा अभिमान आहे.
त्याच्या वाट्याला कधीच दु:ख येऊ नको,
तो जिथे असेल तिथे आनंदाने, हसतखेळत जगू दे.
🙏🎁भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔💖
भाऊबीज शुभेच्छा नवीन / Bhaubeej wishes in marathi language.
बहीण प्रेमाने टिळक लावते, गोड मिठाईचा घास देते,
भाऊ भेटवस्तू देतो आणि तिच्या चेहऱ्यावर खुलतं हास्य उमटतं.
भावा-बहिणीचं हे नातं सदैव घट्ट आणि अटूट राहो,
🎁🧨माझ्या तर्फे तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🎊
हॅपी भाऊबीज! 🪔
तुमच्या नात्यात प्रत्येक वर्षी वाढत राहो स्नेह, आनंद ✨ आणि हसण्याचा गोडवा. 💛
Bhaubeej Hardik Shubhechha in Marathi 2025.
ओवाळल्यानंतर भावाने हसत विचारलं,
“सांग ना ताई, तुला भेट काय देऊ?”
बहिणीचं मनापासून उत्तर
“एकच मागणं आहे भावड्या,
आई-बाबांना कधीही वृद्धाश्रमात नको ठेवू…”
भावानेही दिलं तितकंच सुंदर उत्तर
“ताई, तूही लक्षात ठेव,
कधीही कोणत्याही मुलाला त्याच्या आई-वडिलांपासून दूर करू नकोस…”
भावंडांच्या या पवित्र प्रेमासाठी,
🙏✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💖🪔
Bhaubeej wallpaper in marathi.
लहानपणी या भावाने तुझे कितीतरी वेळा शेंड्या खेचल्या,
मस्करी करत तुझी थट्टाही भरपूर केली,
पण ताई, त्या खोडकर क्षणांवर रागावू नकोस…
नेहमी हसत रहा, आनंदी रहा,
आणि अशीच माझी जिवलग मैत्रीण बनून राहा.
🙏🎁भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा! 💛🪔
Bhaubeej thoughts in marathi.
भाऊ, यश तुमच्या पावलांचा साथीदार ठरो,
आनंद नेहमी तुमच्या सभोवती फुलत राहो.
पण एवढ्या प्रार्थना देवाकडे केल्याबद्दल,
थोडं कमिशन मला पण मिळू दे ना! 😄
🙏🎊आपणास भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 💫🙏✨
भाऊबीज शुभेच्छापत्रे मराठी / Bhaubeej Greetings In Marathi 2025.
पण प्रत्येक भाऊबीजेला साठवलेल्या पैशांतून
माझं आवडतं गिफ्ट आणायला विसरत नाहीस…
Thanks Bhau, तू खरोखरच खास आहेस! 💖
Bhaubeej suvichar in marathi.
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
🎁💥भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.💞😍
bhaubeej text in marathi language.
फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
✨🎁भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!💥
🎁 हॅपी भाऊबीज! 🪔
प्रेम, जिव्हाळा आणि असंख्य आठवणींनी विणलेलं हे नातं सदैव घट्ट राहो.
तुम्हा दोघांना आयुष्यभर आनंद, समृद्धी आणि एकत्रतेच्या शुभेच्छा! 🔥🎉
भाऊबीज शुभेच्छा shayari / Bhaubeej shayari in marathi 2025.
जपावे नाते निरामय भावनेने
जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने.
💥✨भाऊबीजेच्या शुभेच्छा.🎁✨
भाऊबीज कविता मराठी / Bhaubeej poem in marathi 2025.
असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
🎁🎉भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🎁✨🙏
Bhaubeej caption in marathi 2025.
पहिला दिवा उजळला आज दारी,
सुख-समृद्धीची किरणं येवोत तुमच्या घरी.
पूर्ण होवोत तुमच्या सर्व मनोकामना,
🙏🎉भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
भाऊबीज कविता मराठी / Bhaubeej kavita / poem in marathi.
गुणी माझा भाऊ, त्याच्याकडून काय मागू मी,
हात जोडून देवाजवळ एकच प्रार्थना करीन
आशीर्वादाचा वर्षाव सदैव होवो त्याच्या पायाशी,
आणि पूजेला सज्ज राहो माझी प्रत्येक भावना.
🎁🎊भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💫✨
भाऊबीज चारोळ्या मराठी / Bhaubeej charolya in marathi 2025.
बहिणीचे भावाचे प्रेम अतूट आहे,
महागडे भेटवस्तू नको बहिणीला
शतकानुशतके अतूट राहिल नाते,
माझ्या भावाला अपार आनंद मिळो.
🙏❣️भाई दूजच्या शुभेच्छा!💥🎉
🪔 भाऊबीजच्या शुभेच्छा कशा द्याव्यात?
भाऊबीजच्या शुभेच्छा प्रेमाने आणि आपुलकीने द्याव्यात.
उदा.“भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! नात्यात सदैव स्नेह, विश्वास आणि आनंद नांदो.”
मोठ्या भावासाठी भाऊबीजच्या मराठी शुभेच्छा कश्या द्याव्यात?
मोठ्या भावासाठी शुभेच्छा त्याच्या प्रेम, संरक्षण आणि आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून घ्याव्यात.
उदा.“दादा, तू माझा खरा आधार आहेस. तुला भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
भाऊबीज म्हणजे काय?
भाऊबीज हा दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सण आहे, ज्यात बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते.
भाऊबीज कधी साजरी करावी?
भाऊबीज कार्तिक महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला साजरी केली जाते. दिवाळीतील हा शेवटचा सण मानला जातो.
भाऊबीजेचे महत्त्व काय आहे?
भाऊबीज हा भावंडांच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा प्रतीक आहे.या दिवशी भावाने बहिणीचे रक्षण आणि साथ देण्याचं वचन दिलं जातं.
भाऊबीजेची कथा काय आहे?
पौराणिक कथेनुसार, यमराज आपल्या बहिणीकडे यमुनाकडे भेटायला गेला. तिने त्याचं ओवाळन करून त्याचं स्वागत केलं, आणि तो आनंदाने तिला आशीर्वाद देऊन गेला.त्या दिवसापासून भाऊबीज हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
🙏Final word.🙏
भाऊबीज हा सण फक्त ओवाळणीचा नाही,
तर भावंडांच्या प्रेम, काळजी आणि नात्यातील जिव्हाळा जपण्याचा आहे. आजचा दिवस खास बनवा ,तुमच्या बहीण-भावाला शुभेच्छा द्यायला विसरू नका. कारण अशा नात्यांची किंमत शब्दांपेक्षा भावनांनी मोजली जाते. आजची ही पोस्ट तुमच्या मित्र – मैत्रिणी बरोबर नक्की share करा.