महात्मा फुले भाषण मराठी / Mahatma phule speech in marathi 2022.
Mahatma phule speech in marathi :ज्योतिराव गोविंदराव फुले यांची गणना भारतातील महान विचारवंत, समाजसेवी, लेखक आणि तत्त्वज्ञांमध्ये केली जाते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांनी समाजातील महिलांच्या उन्नतीसाठी खूप काम केले. एवढेच नाही तर त्यांनी महिलांसाठी देशातील पहिली महिला शिक्षण शाळा उघडली होती. याशिवाय ते भारतीय समाजातील जातीवर आधारित विभाजन आणि भेदभावाचे कट्टर विरोधक होते.त्यामुळे या थोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जन्मदिवस दरवर्षी 11 एप्रिल हा महात्मा ज्योतिबा फुले जयंती म्हणून साजरा केला जातो.
आजच्या पोस्टमध्ये आपण महात्मा फुले भाषण मराठी / Mahatma phule speech in marathi शालेय विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. महात्मा फुले यांच्यावर लिहिलेला हा भाषण इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिला आहे.
महात्मा फुले जयंतीवर लिहिलेला हे भाषण तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन तसेच महात्मा फुले जयंती कार्यक्रमात / (Mahatma phule jayanti speech in marathi) भाषणासाठी वापरू शकता.
महात्मा फुले जयंती भाषण मराठी / Mahatma phule jayanti speech in marathi 2022
सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, व्यासपीठावरील अध्यक्ष, गुरुजनवर्ग, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे सुज्ञ परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणारे सर्व रसिक श्रोते हो !
सर्वांना माझा नमस्कार.
आज मी आपल्यासमोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा / उभी आहे.
महात्मा गांधीजींनी ज्यांचा खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा ! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांतिकारक म्हणून ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा!
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले असे महात्मा! स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे स्त्री शिक्षणाचे जनक असे महात्मा ….
अशा महान समाजसुधारकास, विद्येच्या देवतेस माझे प्रथम त्रिवार वंदन ! महात्मा फुले म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव, सातारा जिल्हयातील कटगुण हे होते.
त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई हे होते. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाईंशी झाला, त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून पूर्ण केले.
महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य व जातीभेद पाहून त्याकाळी ही सामाजिक स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महिलांना साक्षर करण्यासाठी सन १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले व त्यांच्यावर शिकवण्याची जबाबदारी सोपवली.
सावित्रीबाईंना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला, याचे श्रेय ज्योतिबा फुले यांना जाते ज्योतिबा फुले हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. अनिष्ट रूढी व परंपराविरुध्द ते आयुष्यभर लढले. त्याकाळी हिंदूच्या उच्च जातीमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिध्द मानला जाई. वपन न केलेली विधवा अपवित्र मानली जायची.
ही विधवांच्या केशवपनाची अमानुष पध्दत बंद व्हावी, त्यांनी १८६३ मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक ‘ गृह’ सुरू केले. त्यानंतर १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबांनी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली व हजारो अनुयायी घडवले.
विदयेविना मति गेली| मतीविना नीति गेली ॥
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले ॥
वित्तविना क्षुद्र खचले।
इतके अनर्थ एका अविदयेने केले ||
ही अमूल्य शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड ब्राम्हणांचे कसब इ. लोकप्रिय पुस्तके लिहली.
दुर्देवाने २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
आपल्याला आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर दिसत आहेत, ते फक्त, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे ! अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम! जय हिंद ! जय महाराष्ट्र !!🙏
अधिक वाचा👇👇👇
Mahatma jyotiba phule speech in marathi / 10 line speech on mahatma phule / short speech
- महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते.
- वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला.
- १७९१ मध्ये मानवी हक्कांवर आधारित थॉमस पेन यांनी लिहलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले
- तेव्हापासून त्यांनी स्त्री शिक्षण आणि मागासवर्गीयांचे शिक्षण व विकास यावर भर देण्याचे ठरवले.
- २४ सप्टेंबर १८७३ साली त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.
- ज्योतिबा फुले एक परखडपणे आपले विचार मांडणारे लेखक होते. ते थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते.
- त्यांच्या सामाजिक कार्यामुळे जनतेनेच त्यांना महात्मा ही उपाधी दिली.
- विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, | नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एका अविद्येने केले,’ या महात्मा फुले यांच्या सुविचार ओळी प्रसिद्ध आहे.
- त्यांनी शेतकयांचे आसूड, गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब इत्यादी पुस्तके लिहली.
- अशा या महान समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९० साली पुणे येथे निधन झाले.
FAQ?
सातारा जिल्हयातील कटगुण गावी महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म झाला होता.
महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide Mahatma phule speech in marathi, Mahatma phule bhashan in marathi, महात्मा फुले भाषण मराठी ,Mahatma phule information in marathi, Mahatma phule jayanti speech in marathi, Speech on mahatma phule etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍