गुढीपाडवा सण निबंध मराठी / Gudi padwa Festival essay in marathi 2022
Gudi padwa essay in marathi : हिंदू कॅलेंडर गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते. गुढीपाडवा सण देशात उत्साहात साजरा केला जातो, सर्वजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.गुढीपाडवा सण विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण पूर्ण उत्साहाने, चालीरीती आणि विधींनी साजरा केला जातो.
आजच्या पोस्टमध्ये आपण गुढी पाडव्यावर निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. गुढीपाडव्यावर लिहिलेला हा निबंध इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिला आहे.
गुढीपाडव्यावर लिहिलेला हा निबंध तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता.
अधिक मराठी निबंध पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर नक्की भेट द्या 👇👇👇
गुढीपाडवा निबंध मराठी / Gudi padwa essay in marathi.
गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण आहे . हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो. वसंत ऋतूची चाहूल देणारा हा गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो .
पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. असेही म्हटले जाते की त्रेतायुगमध्ये भगवान राम याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती.
गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. गुडी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून गुढी उभारण्यासाठी एका स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात.गुढी बनवण्यासाठी बांबूची लांबलचक काठी रेशमी कापडाने बांधून त्यावर साखरेचा हार, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, झेंडूची फुले बांधली जातात. त्यानंतर पारंपरिक रीतीनुसार गुढीची पूजा करून तिला घराबाहेर उंच काठीवर आकाशाच्या दिशेने उभे केले जाते. गुढीच्या अवतीभवती रांगोळी व इतर सजावट केली जाते.या दिवशी लोक वस्तू खरेदी, सोने खरेदी करतात. काही लोक या मुहूर्तावर व्यवसायाचा प्रारंभ किंवा नवीन उपक्रमाचा प्रारंभ करतात कारण गुडीपाडवाचा मुहूर्त खूप शुभ मानला जातो .घरावर उभारलेली गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते . या दिवशी घरोघरी खूप गोड पदार्थ बनवली जातात . आपल्याकडे गुडीपडवा निमित्ताने प्रत्येक घरी गोडधोडाचे जेवण बनवले जाते. यामध्ये श्रीखंड – पुरणपोळी, पुरीचा खास भोजन करतात आणि दिवसाची सुरुवात गोड करतात. यानंतर सूर्यास्तापूर्वी हळद-कुंकू ने पूजा करून अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.
अधिक वाचा👇
गुढीपाडव्याचे जसे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक महत्त्व देखील आहे. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी संपून उन्हाळा वाढायला लागतो. या वेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील कीटकांचा नाश होतो ,रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते . गुढी पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष असते. मराठी नवीन वर्षाच्या सर्व जण एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी कुटुंबातील सर्वजण सोबत एकत्र भोजनाचा आनंद घेतात.
FAQ
गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी आणि श्रीखंड खास तयार केले जातात.
हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते.
गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात.
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide Gudi padwa essay in marathi, Gudi padwa nibandh in marathi, गुढीपाडवा निबंध मराठी,Gudi padwa information in marathi,
Gudi padwa short essay in marathi,
Gudi padwa essay in marathi 10 line etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍